ट्रॅक्टरचे उर्वरित पैसे मागितल्याच्या कारणावरून एकाला मारहाण !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ट्रॅक्टर विक्री केल्यानंतर उर्वरित पैशांची मागणी केल्याच्या कारणावरून चाळीसगाव तालुक्यातील सांगवी गावात एका तरूणाला शिवीगाळ करत काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना शुक्रवार १७ मे रोजी रात्री ९.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी १९ मे रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण ओंकार जाधव वय ३२ रा. सांगवी ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. प्रविण जाधव यांनी गावातील सुनिल ओंकार जाधव याला ट्रॅक्टर विक्री केले होते. ट्रॅक्टरचे उर्वरित ६५ हजार रूपये बाकी होते. शुक्रवार १७ मे रोजी रात्री ९.३० वाजता प्रविण जाधव यांनी सुनिल जाधव यांच्याकडे पैसे मागितले. याचा राग आल्याने सुनिल ओंकार जाधव, यमुनाबाई सुनिल जाधव, धारासिंग सुनिल जाधव, योगेश सुनिल जाधव सर्व रा. सांगवी ता. चाळीसगाव यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच एकाने काठी मारून दुखापत केली. याप्रकरणी प्रविण जाधव याने चाळीसगाव ग्रामीण पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १९ मे रोजी दुपारी ४ वाजता मारहाण करणारे सुनिल ओंकार जाधव, यमुनाबाई सुनिल जाधव, धारासिंग सुनिल जाधव, योगेश सुनिल जाधव सर्व रा. सांगवी ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शंकर जंजाळे हे करीत आहे.

Protected Content