जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विशाल कॉलनीतील माहेरवाशिनीला सासरी पुणे येथे कौटुंबिक वादातून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील विशाल कॉलनीतील माहेर असलेल्या श्रध्दा महेश जैस्वाल वय ३४ यांचा विवाह पुणे येथील महेश रमेश जैस्वाल यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर सुरूवातीला १ वर्ष सासरच्या मंडळींनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर विवाहितेला घरातील कौटुंबिक वादातून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, चुलत सासरे, चुलत ननंद आणि मामसासरे यांनी देखील शरिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी जळगाव येथील विशाल कॉलनी येथे माहेरी निघून आल्या. त्यानंतर शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती महेश रमेश जैस्वाल, सासू रेणूका रमेश जैस्वाल, चुलत सासरे सुरेशलाल बैजनाथ जैस्वाल, चुलत ननंद दिपाली जैस्वाल आणि माम सासरे कृष्णकांत जैस्वाल सर्व रा. पुणे यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोहेकॉ पल्लवी मोरे ह्या करीत आहे.