![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/advt-3.jpg)
नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नागपूर जिल्हयात यूपीएससीची तयारी करणाऱ्या तरूणीचा पोलिस निरीक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अकोला जिल्हयातील खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धनंजय सायरे यांच्यावर नागपूरातील नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २२ वर्षीय तरुणीची छेडखानी केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/Half-Page-1.jpg)
मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, नागपुरातील नंदनवन भागात राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरूणीची धनंजय सायरे यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी ही युवती यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होती. दरम्यान, या ओळखीतून धनंजय सायरे यांनी या तरूणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने नकार दिल्यावर छेड काढत विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरूणीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी धनंजय सायरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/07/second-advt-ap.jpg)