जळगाव (प्रतिनिधी) शासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अनेक महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या मागण्यांची शासनास आठवण करुन देण्यासाठी तसेच या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने आज लक्षवेध दिन पाळण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने प्रलंबित मागण्यांसाठी आज सर्व जिल्ह्यांमध्ये लक्षवेध दिन पाळण्यात आला. या मागण्यांमध्ये पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, आश्वासित प्रगती योजनेतंर्गत बढतीच्या लाभासाठी घालण्यात आलेली वेतनमर्यादा, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे आदि शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांबाबत शासनास वारंवार निवेदन देवूनही कार्यवाही अद्यापपर्यंत कार्यवाही न झाल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने लक्षवेध दिन पाळण्यात आला. राजपत्रित अधिकारी महासंघाच्यावतीने अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना निवेदन देण्यात आले. या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्यासाठी सदरचे निवेदन मा. मुख्यमंत्री महोदयांकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी उपस्थितांना सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकरी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब घोरपडे यांचेसह जळगाव जिल्ह्याचे पदाधिकारी राज्य कर उपायुक्त सुर्यकांत कुमावत, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडित, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुनिल सुर्यवंशी, श्री. विनोद चावरिया, लेखाधिकारी सर्वश्री. आर. बी. जोशी, कैलास सोनार, राजेश देशमुख, प्रकाश चौधरी, सहायक आयुक्त (जीएसटी) प्रशांत पाटील, उपविभागीय अभियंता मधुकर सोनवणे, शिवाजीराव भोईटे, आर. बी. बाविस्कर आदि उपस्थित होते.