गोठ्यातून शेतकऱ्याची बैलजोडीची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भऊर गावातील गोठ्यात बांधलेली ३० हजार रूपये किंमतीची बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १ मे रोजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती शनिवारी १८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भऊर गावात विशाल नंदलाल पाटील वय ३५ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता विशाल पाटील यांनी त्यांच्या गावातील गोठ्या त्यांच्या मालकीचे दोन बैल बांधलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री गोठ्यात बांधलेली ६० हजार रूपये किंमतीची बैलजोडी चोरून नेली. ही घटना दुसऱ्या दिवशी १ मे रोजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले. त्यांनी बैलजोडीचा सर्वत्र शोध घेतला परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी शनिवारी १८ मे रोजी दुपारी साडेतीन वाजता मेहुणबारे पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनवर तडवी हे करीत आहे.

Protected Content