Home Cities अमळनेर शेतातील मोबाईल टॉवरची ईलक्ट्रीक बॅटरी आणि साहित्याची चोरी

शेतातील मोबाईल टॉवरची ईलक्ट्रीक बॅटरी आणि साहित्याची चोरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील दहीवद शिवारातील शेतात असलेल्या मोबाईल टॉवर येथून इलेक्ट्रीक बॅटरी आणि इतर साहित्य असा एकुण १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ५ मे रोजी दुपारी दीड वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील दहीवद शिवारातील शेत गटक्रमांक १८६ मध्ये मोबाईल टॉवर बसविण्यात आले आहे. ४ मे रोजी रात्री ११.३० ते ५ मे रोजी मध्यरात्री दुपारी दीड वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवर येथील १५ हजार रूपये किंमतीचे ईलक्ट्रीक बॅटरी आणि साहित्य चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर देखरेख करणारे सुपरवायझर विलास अरूण घोडके रा. प्रताप नगर, अमळनेर यांनी शनिवारी १८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविारेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय भोई हे करीत आहे.


Protected Content

Play sound