प्रसिध्द व्यावसायिकाच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने मोटरसायकलवरील दोन जणांना चिरडले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे शहरात मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे. शहरातील एका प्रसिध्द बांधकाम व्यावसायिकांच्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीचाकीवरील दोन जणांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात करणारा आरोपी अल्पवयीन असून त्याच्या विरोधात येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. अनिस अवलिया व अश्विनी कोस्ता असे अपघातातील मृत झालेल्याचे नाव आहे. ते दोघेही राजस्थानमधील होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, अश्विनी आणि अनिस हे दोघेही त्यांच्या मोटारसायकल वरून कल्याणीनगरकडून येरवड्याकडे मित्रांसह जात होते. त्यावेळी पोर्से या आलिशान कार याच रस्त्याने भरधाव वेगात निघाली होती. कारमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या गाडीने मोटारसायकल आणि इतर वाहनांना धडक दिली. यामध्येच दोघांचा मृत्यू झाला. गाडी 200 च्या स्पीडने होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

Protected Content