खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अभियांत्रिकी संस्थेत शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांची गुणवत्ता तपासणी करून त्यांना नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडीटेशन नवी दिल्ली (राष्ट्रीय प्रमाणन मंडळ) द्वारे मानांकन प्रदान केल्या जाते. शासकीय तंत्रनिकेतन, खामगांव येथे अभियांत्रिकी संस्थांसाठी आवश्यक असलेले मानांकन स्थापत्य अभियांत्रिकी विभागाला २०२४-२५, २०२५-२६ व २०२६-२७ या ३ वर्षांकरीता मानांकन प्रदान केल्या गेले आहे. अशा पद्धतीने संस्थेतील अणुविद्युत व स्थापत्य या दोन शाखा एन.बी.ए.मानांकित झालेल्या असून यावर्षी संगणक आणि विद्युत या दोन शाखा हे मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.
सदर मानांकनासाठी आपल्या भेटीदरम्यान समितीने निकषानुसार कागदपत्रांद्वारे अभिलेख व संसाधनांची पाहणी केली आणि संस्था स्तरावर विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असलेल्या सोई सुविधांचा प्रत्यक्षात आढावा घेतला जसे की कर्मशाळा, ग्रंथालय, अॅकेडमिक्स, संगणक प्रयोगशाळा, भौतिकशास्त्र प्रयोगशाळा, रसायनशास्त्र प्रयोगशाळा, भाषा प्रयोगशाळा, कार्यालय, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, जिमखाना, खेळांची मैदाने, माजी विद्यार्थी सभागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुलींसाठी स्वतंत्र विश्रामकक्ष, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, प्रशिक्षण व आस्थापना कक्ष, प्लेसमेंट रेकॉर्ड्स, कार्यालयातील आस्थापना विभाग, अकौंट विभाग, विद्यार्थी विभाग, कर्मचा-यांचे पगारपत्रक, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती इत्यादी सर्व बाबी तपासून पाहिल्या.
तसेच स्थापत्य विषयतज्ञ यांनी स्थापत्य विभागातील सैध्तान्तिक व प्रयोगशाळेच्या सर्व शैक्षणिक बाबी तपासल्या आणि सर्व विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संस्थेत आजी-माजी विद्यार्थी व उद्योगपती यांची सभा मुल्यांकन समिती समवेत घेण्यात आली, ज्यामध्ये अनेक प्रतिथयश माजी विद्यार्थी व उद्योगपतींनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालक डॉ विनोद मोहितकर यांच्या कल्पक नेतृत्वाखाली, सहसंचालक डॉ विजय मानकर यांच्या मार्गदर्शनातून, प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांच्या कौशल्यपूर्ण प्रशासनात व समन्वयक प्रा परांजपे, सहसमन्वयक प्रा पद्मणे यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनात संस्थेतील स्थापत्य विभागप्रमुख प्रा विजय आटोळे, प्रा सचिन सोनी, डॉ प्रसाद बाहेकर, प्रा मानस घोडले, प्रा नरेंद्र वाघमारे, प्रा सुमित फडतरे, स्थापत्य व उपयोजित यंत्रशास्त्र विभागातील श्री पी.व्ही.ठेंग, श्री जयंत पाटील, श्री कुंडेंटकर, श्री सुरेश ठाकरे यांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे हे यश प्राप्त झाले. तसेच जिमखाना उपाध्यक्ष प्रा राजेश मंत्री, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी प्रा अरुण काकड, शैक्षणिक अवेक्षक प्रा केशव बेले व इतर सर्व विभागप्रमुख, प्रबंधक श्री योगेश भुसारी, श्री महेंद्र राणे यांचेसह संस्थेतील सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांचे बहुमोल सहकार्य लाभले असे मानस प्राचार्य डॉ समीर प्रभुणे यांनी यावेळेस व्यक्त केले.