जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हसावद येथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विटभट्टीवर काम करणारा मजूर हिरालाल रतन कुंभार (वय 40 रा. कुंभारवाडा म्हसावद) हा 25 जून रोजी सायंकाळी ६ वाजेपासून घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. दरम्यान आज (गुरुवार) सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाला लागून असलेल्या गिरणा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. मयत हिरालालचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी, ६ मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. चिन्मय कोल्हे यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा प्राथमिक तपास पो.ना.सचिन मुंडे करीत आहे.