जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भोकर येथील माहेरवाशीनीला सासरी नाशिक येथे ट्रॅक्टर घेण्यासाठी दिलेले एक लाख ७० हजार रुपये परत मागितल्याने जावयाने वृषाली उमेश वाघ (वय-२५) या विवाहितेला मारहाण केली. याप्रकरणी रविवारी 4 मे रोजी रात्री 8 वाजता सासरच्या चार जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वृषाली यांचा विवाह तालुक्यातील भोकर येथील उमेश वाघ याच्याशी झाला. त्यानंतर वृषाली यांच्या वडिलांनी उमेश याला ट्रॅक्टर घेण्यासाठी एक लाख ७० हजार रुपये दिले होते. ती रक्कम परत मागितल्याने पतीने विवाहितेला मारहाण केली. तसेच घर खर्चासाठी माहेरुन पैसे आणले नाही तर तुला राहू देणार नाही, अशी धमकी दिली. या सोबतच सासू, जेठ, दीरानेही शिवीगाळ करत शारीरिक व मानसिक छळ केला. मार्च २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या दरम्यान हा छळ सुरू होता.
या प्रकरणी विवाहितेने तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून रविवार, ५ मे रोजी रात्री आठ वाजता पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील करीत आहेत.