जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आसोदा येथील ४० वर्षीय तरूण हा कामावर जात असल्याचे सांगून रविवार २८ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून बेपत्ता झाला आहे. याप्रकरणी मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मोहन आनंदा सोनवणे वय-४० रा. आसोदा ता.जि.जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील आसोदा गावातील पाटील वाडा येथे मोहन आनंदा सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी २८ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता कामावर जात असल्याचे सांगून तो घरातून निघून गेला. सायंकाळी तो कामावरून घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर नातेवाईकांनी मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.