जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पाथरी शिवारातील शेतात ज्वारी कापण्याचे काम सुरू असतांना रानडुकराने हल्ला केलेल्या दोनजण गंभीर जखमी झाल्याचे घटना घडली आहे. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील पाथरी गावात अमर राजाराम बारेला वय १९ आणि दिनू मोलशा बारेला वय २० हे वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवारी २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पाथरी शिवारातील शेतात ज्वारी कापण्याचे काम करत असतांना त्यांच्यावर रानडूकराने हल्ला केला. यात हल्ल्यात अमर बारेला यांच्या डोक्याला, कमरेला आणि हाताला चावा घेतला तर दिनू बारेला याच्या हाताचे बोटच रानडुकराने तोडून मांडीवर मोठी जखम केले आहे. जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासाठी गावातील पोलीस पाटील संजीव लंगरे सहकार्य केले. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. वनविभागाचे वनरक्षक जितेंद्र चिंचोले यांनी जखमींशी चौकशी केली आहे.