अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कंजरवाडा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी नंदुरबार येथे ६ लाखांची मागणी शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील कंजरवाडा येथील माहेर असलेल्या वैशाली रितेश चव्हाण व 23 यांचा विवाह नंदुरबार येथील रितेश मनोज चव्हाण यांच्याशी रीतीरिवाजानुसार झालेला आहे. दरम्यान पती रितेश चव्हाण याने जिम बांधण्यासाठी माहेराहून ६ लाख रुपये आणावे अशी मागणी विवाहितेला केली. दरम्यान विवाहितेच्या आई वडिलांचे परिस्थिती हालाखीचे असल्या कारणामुळे त्यांनी पैसे आणले नाही, याचा राग आल्याने पती रितेश चव्हाण यांनी विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सासू-सासरे, दीर, नणंद आणि आजल सासरे यांनी देखील पैशांसाठी छळ केला. दरम्यान हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजता विवाहितेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती रितेश मनोज चव्हाण, दीर शुभम मनोज चव्हाण, दुसरा दिर सिद्धार्थ मनोज चव्हाण, सासरे मनोज वीरसिंह चव्हाण, सासु कौशल्य मनोज चव्हाण, ननंद दिशा मनोज चव्हाण आणि आजल सासरे ज्ञानेश्वर तारसिंग चव्हाण सर्व रा. नंदुरबार या ७ जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहे.