जळगाव (प्रतिनिधी) आदर्श नगर पुष्कराज अपार्टमेन्ट जवळील पाणपोळीजवळ काळ्या रंगाची अँक्टीवा मोटारसायकल (एमएच १९ ऐ यल ६००३) गाडी १७ जूनपासून उभी आहे. मात्र, ती गाडी १० दिवस झाले कोणी घेऊन जात नसल्यानेरामानंद पोलिसांत माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनावणे फोनद्वारे २२ जून रोजी रात्री ठिक ९ वाजून ४६ मि. ला तक्रार करून देखील गाडी बेवारसस्थितीत पडून आहे.
मागील १० दिवसापासून काळ्या रंगाची ऍक्टिव्हा कोणीही घेवून जात नसल्याची माहिती माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी २२ जून रोजी रामानंद पोलिसांत दिली. तेव्हा ठाणे अंमलदार यांनी रात्री गस्त घालणारे पोलीस येतील ते ही गाडी घेवून जातील आसे सागितले. मात्र, पोलिसांनी आजपर्यत ती गाडी नेली नसल्याचे श्री. सोनवणे यांनी सांगितले आहे. आजकाल बेवारस गाडीला हात लावायला कोणीही घाबरतो. ती गाडी चोरीचीही आसू शकते किंवा जर कोणी बाँमपण ठेवू शकतो अशी शंका उपस्थित करण्यात येत आहेत. गाडीवर प्रांक्टीकल गँरेजचा नबांर होता त्यानाही विचारले पण त्यानी सागितले गेल्या पाच वर्षात ह्या गाडी नबंर असलेली मोपेड माझ्याकडे दुरूस्तीला आलेली नाही त्याचे रेकाँड नाही असे स्प्ष्ट केले आहे.