Home क्राईम जुन्या वादातून एकाच्या घरावर हल्ला चढवत घरातील सामानांची तोडफोड !

जुन्या वादातून एकाच्या घरावर हल्ला चढवत घरातील सामानांची तोडफोड !

0
112


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात जुन्या वादातून एकाच्या घरात घुसून शिवीगाळ करत घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले. तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शनिवार ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अरूण भिमराव गोसावी वय ४७ रा. तुकाराम वाडी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवार ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता हे घरी होते. त्यावेळी जुन्या वादाच्या कारणावरून भूषण माळी उर्फ भाचा, आकाश ठाकूर उर्फ खंड्या, पवन बाविस्कर उर्फ बंद्या, सचिन चौधरी उर्फ टिचकुल्या, आकाश मराठे उर्फ ब्रो सर्व रा. तुकाराम वाडी आणि चेतन सुशिर उर्फ बटाट्या रा. पिंप्राळा यांनी अरूण गोसावी यांच्या घरासमोर येवून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तु कसा आमच्या विरूध्द केस चालवतो तुला बघतो, आज तुझा मर्डरच करतो अशी धमकी देवून घरातील सामांनांची तोडफोड करून नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि महेंद्र वाघमारे हे करीत आहे.


Protected Content

Play sound