बंद घर फोडून ७० हजारांचे दागिने लांबविले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील सर्वेश्वर नगरात बंद घर फोडून घरातून ७० हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी ६ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील सर्वेश्वर नगरात इॅमॅन्यूअल गॅब्रीअल वय २७ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३ एप्रिल रोजी रात्री ९ ते ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान तरूणाचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कूलूप तोडून आत प्रवेश करत ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले हा प्रकार ४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी शनिवार ६ एप्रिल मध्यरात्री २ वाजता रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमाकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content