पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील राजीव गांधी नगर येथील रहिवासी व येथील कुटीर रुग्णालयाचे कर्मचारी दिपक बारकू सोनार यांनी रुग्णालयाचा आवारात त्यांच्या आई स्व. मालुबाई काशिनाथ सोनार यांच्या स्मरणार्थ मोफत पाणपोई सुरू केली.
यावर्षी उन्हाचे तापमान जास्त असल्याने या गोष्टीच्या विचार करून सोनार यांनी स्वखर्चाने आपल्या स्वर्गवासी आईच्या स्मरणार्थ रुग्णांसाठी पाणपोई सुरू केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. व दीपक भाऊ सोनार यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी पारोळा येथील मतिमंद मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना भोजन व विविध प्रकारच्या वस्तू शाळेला भेट देत असतात व त्यांचे मित्र त्यांना वेळोवेळी अनमोल सहकार्य करत असतात. यावेळी प्रसाद राजहंस, भुषण पाटील, रिंकू शेलार, सागर मराठे, मनोज सोनार, भैय्या शेलार, दिपक पाटील, अजय बेंडवाल, रोहन लोहरे आदींचे सहकार्य लाभले.
दरम्यान सोनार हे आपल्या प्रत्येक वाढदिवशी फळ वाटप, घरगुती साहित्य वाटप, शाळेत अल्पोपहार वाटप आदी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. दरम्यान पारोळा कुटीर रुग्णालयात काही दिवसांपासून रुग्णांना पिण्याचा पाण्याची तीव्र अडचण भासत होती. कुटीर रुग्णालयात फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे, परंतु काही कारणास्तव टाकी भरली जात नाही तसेच फिल्टर जाम होते. त्यामुळे रूग्णांना पिण्यासाठी पाणी सहसा भेटत नाही. रुग्णांची गैरसोय व्हायला नको म्हणून रुग्णालयाच्या आवारात पाणपोई सुरू केल्याचे सोनार यांनी सांगितले.