पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथील रहिवासी यश प्रफुल्ल लोढा यांनी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत उत्कृष्ट श्रेणीमध्ये घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले असून लोढा परिवारात डॉक्टर होण्याचा मान मिळवला आहे.
डॉ. यश प्रफुल्ल लोढा हा येथील पहूर नगरीचे शिल्पकार माजी जि. प. कृषी सभापती व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप लोढा यांचा पुतण्या तर कृषी पंडित मोहनलाल लोणार केंद्राचे संचालक प्रफुल्ल मोहनलाल लोढा यांचा मुलगा आहे. त्यांच्या या यशाबद्दल पहूरसह परिसरातून अभिनंदन होत आहे.