भुसावळ प्रतिनिधी । पहिल्याच पावसात भुसावळ शहरातील राहुलनगर परिसरात झोपड्यांच्या मध्ये पाणी आणि चिखल शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भुसावळ शहरातील रेल्वे उत्तर वॉर्डातील अतिक्रमण रेल्वेच्या वतीने हटविण्यात आले होते. या अतिक्रमणधारकांना भुसावळ शहरा लगतच असलेल्या सर्वे नंबर ६१ राहुलनगर या भागात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी रस्ते गटार आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पहिल्याच पावसात या परिसरात रात्रीच्या वेळेस घरांमध्ये पाणी आणि चिखल घरात शिरल्याने येथील नागरीकांच्या सामनाचे मोठं नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी आणि चिखल झाल्याने त्यांना राहत्या घरात राहणे. मुश्किल झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. पालिकेने या ठिकाणी त्वरित प्राथमिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांनी आता केली आहे.