सामाजिक न्याय दिनानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Dgl5m9ZWkAAqBry

 

*जळगाव (प्रतिनिधी)* राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म दिवस अर्थात सामाजिक न्याय दिनानिमित्त बुधवार (दि.26) रोजी समाजकल्याण विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.

 

श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, 26 जून 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता जी. एस. ग्राउंड येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग होणार आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. पाटील यांनी केले आहे.

Protected Content