जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात एका भंगार विक्री करणाऱ्या तरूणाला मारहाण करून जवळील १ हजार रूपये जबरीकाढून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता घडला आहे. याप्रकरणी सकाळी ११.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जुबेर सलीम खान वय ३२ रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून भंगार विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमी प्रमाणे गुरूवार २२ फेब्रुवारी रोजी भंगार विक्री करण्यासाठी गेंदालाल मिल परिसरात असतांना सकाळी ८ वाजता मुसेफ शेख अकील रा. गेंदालाल मिल, जळगाव हा दुकानावर आला. त्याठिकाणी जुबेर याच्याकडे पैसे मागितले. तू तुझ्याजवळचे पैसे मला दे, नाहीतर तुझे डोके फोडेल, तु माझ्याबद्दल कुणाला सांगितले तर तुझा खून करेल अशी धमकी देवून मारहाण केली व जुबेरच्या खिश्यातून १ हजार रूपये बळजबरी काढून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर जुबेर सलीम खान याने शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सकाळी ११.३० वाजता संशयित आरोपी मुसेफ शेख अकील रा. गेंदालाल मिल, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.