जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील हिताची अस्टोमो या खाजगी कंपनीततील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आज मंगळवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयात जोरदार निदर्शने करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील हिताची अस्टोमो या खासगी कंपनीने काही कामगारांना कामावरून कमी केले होते. दरम्यान या संदर्भात महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघच्या वतीने कामगारांना पुन्हा कामावर हजर करावे, यासाठी वारंवार निवेदन व आंदोलने करण्यात आले. त्यामुळे कंपनीने काही कामगारांना कामावर हजर केले परंतू उर्वरित ८० ते ८५ कामगारांना अद्यापपर्यंत कामावर हजर केलेले नाही. यामुळे कामगारांसह त्यांच्या कुटुंबावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे.
दरम्यान उर्वरित कामगारांना देखील कामावर घ्यावे, या मागणीसाठी मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता आंबेडकर मार्केट येथील कामगार आयुक्त कार्यालयात आंदोलन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन कामगार आयुक्त यांना देण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सचिव किरण पाटील, नरेंद्र पाटील, लीलाधर नन्नवरे, चंदू नन्नवरे, प्रमोद कोळी, योगेश नन्नवरे, विठ्ठल नन्नवरे, यांच्यासह कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.