मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी, आणि शिट्टी यांचा समावेश आहे.
शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये कपबशी, शिट्टी आणि वडाचं झाड या चिन्हांचा समावेश आहे. यांपैकी एक कुठलंही चिन्ह शरद पवार गटाला मिळू शकतं. याआधी निवडणूक आयोगानं शरद पवारांच्या गटाला ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं नवं नाव दिलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं अजित पवारांच्या बाजूनं निकाल देत पवारांना मोठा धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोगानं अजित पवारांना दिलं. येत्या राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा पवारांना मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे आणि येत्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार गटाला नवे नाव आणि चिन्हांचे प्रत्येकी तीन पर्याय सादर करण्यास सांगितले आहेत. तरी, शरद पवार गटाचं नाव आणि निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला आहे.