फैजपुर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । २ फेब्रुवारी जागतिक पाणथळ प्रदेश दिनाचे महत्व लक्षात घेऊन बहुळा धरण येथे पक्षी गणना करण्यात आली. या गणनेत ७३ जातींचे ९४२ पक्ष्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी आमच्या प्रतीनिधीशी बोलतांना दिली. ते पुढे म्हणाले की पक्षी व पर्यावरण यांचा परस्पर संबंध आहे,पाणथळ पक्ष्यांचे अस्तित्व हे पाणथळ प्रदेशच्या/जागेच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे.पा
णथळ जागी पक्ष्यांच्या किती जाती आहेत व किती संख्येनी आहे त्यावर पाणथळ जागेची गुणवत्ता ठरत असते. त्या दृष्टीने पाणथळ पक्षी गणनेचे महत्व आहे.हे ओळखून आम्ही ही गणना केली. गणनेत पाणथळ पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने यांत विदेशातून आलेले थापट्या,तलवार बदक, चक्रांग,भुवई हे बदक,सैबेरीअन गप्पीदास,पांढरा धोबी,पिवळा धोबी,ठीपकेवाली आणि हिरवी तुतारी, रिचर्ड्सची तीरचिमणी यांचे दर्शन झाले. त्याच बरोबर स्थानिक पक्ष्यांमध्ये वारकरी, युरेशियन चमचा,उघड्चोच करकोचा,स्वरल,रात बगळा,पाणकावळे,हळदी कुंकू बदक,शेकटे, कंठेरीचिखला,कीरपोपट,होला,जांभळी पाणकोंबडी,लाजरी पाणकोंबडी,काळी पाणकोंबडी,रंगीत करकोचा यांची नोंद झाली. ही पक्षी गणना पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ,राजेंद्र गाडगीळ व बाळासाहेब महांगडे यांनी केली. या गणनेत अपेक्षित असणारे चक्रवाक, नयनसरी, शेंडीबदक, तिरंदाज, पाणलाव, छोटा आर्ली, कैकर,अटल बदक, युरेशियन दलदल, कांडेसर हे पक्षी दिसले नाहीत.