जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरुनानक नगरात काहीही कारण नसताना दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि बॅट घेऊन एकमेकांना मारहाण केल्याची घटना शनिवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात ६ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुनानक नगर येथे बेंडवाल आणि शिंदे परिवार वास्तव्याला आहे. शनिवार ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता काहीही कारण नसताना पहील्या गटातील जोगिंदर सुनील शिंदे आणि प्रवीण सुनील शिंदे दोन्ही रा. गुरुनानक नगर तर दुसऱ्या गटातील राजेश प्रभू बेंडवाल, सोजल राजेश बेंडवाल, रोहन राजेश बेडवाल आणि रवी दीपक चावरिया सर्व रा. गुरुनानक नगर यांच्यात लोखंडी रॉड, लाकडी दांडा आणि बॅटचा वापर करून एकमेकांना मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाता याप्रकरणी पहिल्या गटातील प्रवीण सुनील शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेश बेंडवाल, सुजल बेडवाल, रोहन बेंडवाल आणि रवी चावरिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातून सविता बेंडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोगिंदर शिंदे आणि प्रवीण शिंदे यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रदीप नन्नवरे आणि पोहेकॉ शिकांत पाटील हे करीत आहे.