Home Cities जळगाव पोलीस सेवेतील दोन पोलीस अधिकारी सेवानिवृत्त; प्रशासनातर्फे सत्कार

पोलीस सेवेतील दोन पोलीस अधिकारी सेवानिवृत्त; प्रशासनातर्फे सत्कार


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दलातून दोन अधिकारी हे आज 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात पोलीस उपाधीक्षक प्रमोद पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की , जळगाव जिल्हा पोलीस दलातील ०२ अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त ३१ जानेवारी रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलातुन ०२ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यात पोहेकॉ गोकुळ बुधा तायडे, पोहेकॉ प्रदिपकुमार विनायक ठाकुर असे पोलीस अंमलदार सेवानिवृत्त झाले. त्यांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील प्रेरणा सभागृहात श्री प्रमोद पवार पोलीस उपअधिक्षक यांच्याहस्ते कुटुंबासह सत्कार करून निरोप देण्यात आला.

पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, अपर
पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग जळगाव संदिप गावीत यांनी सेवानिवृत्त होणा-या पोलीस अंमलदार यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सदर प्रसंगी पोउपनिरी, रेश्मा अवतारे, मानव संसाधन विभाग, राखीव पोउपनिरी रामेश्वर सोळंके आदी मान्यवरांसह अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोउपनिरीक्षक, रावसाहेब गायकवाड, पोहेकॉ- सतिष देसले यांनी परीश्रम घेतले.


Protected Content

Play sound