Home Cities बोदवड बोदवडच्या नगराध्यक्षपदी बागवान; उपनगराध्यक्षपदी माळी

बोदवडच्या नगराध्यक्षपदी बागवान; उपनगराध्यक्षपदी माळी

0
59

bodvad president vice president

बोदवड प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदची भाजपच्या मुमताजबी सईद बागवान तर उपाध्यक्षपदी दिनेश नारायण माळी यांची आज निवड करण्यात आली.

बोदवडच्या नगरपंचायतीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यामुळे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात नगराध्यक्षपदासाठी भाजपने विद्यमान नगराध्यक्ष मुमताजबी बागवान यांना उमेदवारी दिली होती. यात मुमताजबी बागवान यांची पुन्हा नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना दहा मते मिळाली तर विरोधी उमेदवार पालवे यांना सहा मते मिाली. तर उपाध्यक्षपदी दिनेश माळी यांची निवड करण्यात आली. या पदासाठी विरोधकांनी उमेदवारच उभा न केल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली.


Protected Content

Play sound