जळगाव प्रतिनिधी । येथील वाघनगर भागातील संत रोहिदास प्रतिष्ठान कडून आज (दि. 21 जुन) रोजी सकाळी 7 वाजता योगदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी, वाघनगर विभागातील वयोवृध्द मंडळी कडून योगशिक्षक प्रतिभा पवार आणि अक्षय खरे यांनी प्रात्यक्षिक योगा करून घेत व त्याचे महत्त्व पटवून दिले. योगामुळे या वृद्ध वयोगटात होणारे समस्या कमी होता. तसेच नियमित व्यायाम केल्याने शरीरिक थकवा जाणवत नाही. म्हणून योगासन हे दैनंदिन केले पाहिजे, असे यावेळी सांगण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी वाघ नगर येथील सर्व वयोवृद्ध मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.