Home क्राईम चाळीसगावात महिलेच्या गळ्यातून दोन साखळ्या लंपास

चाळीसगावात महिलेच्या गळ्यातून दोन साखळ्या लंपास

C
C

C

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याच्या घटनाही नेहमीच घडत आहेत.

 

काल (दि.२०) संध्याकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सौ. वासंतादेवी जगन्नाथ खलाणे (वय ६५) राहणार विवेकानंद कॉलनी, करगाव रोड या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची दोन तोळे सोन्याची पोत व २० हजार रुपये किंमतीची काळे मणी असलेली सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने गळ्यातून हिसका देवून चोरून नेल्याची घटना शहरातील ब्राईट साईट इंग्लिश मीडियम स्कूलजवळ घडली. याबाबत पोलिसात भादवी ३९२/३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही करीत आहेत.


Protected Content

Play sound