यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरात येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मंदीर स्थापनाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या शोभा यात्रेच्या दिवशी नगर परिषदच्या वतीने शोभायात्रा मार्गावर स्वच्छता करण्यात येऊन त्या दिवशी शहरात मांस-मटन विक्री बंद ठेण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी नगर परिषद प्रशासनास दिले आहे .
याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विधी विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी हेमंत निकम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरात दिनांक २२ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता काढली जाणारी शोभायात्रा ही श्रीराम मंदिर स्थापनाच्या निमित्ताने शहरातील पारनेरकर महाराज मंदिर, विरार नगर, आयटीआय, सातोद रोड, श्रीराम मंदीर, बुरूज चौक, छत्रपती संभाजी चौक ते महाजन गल्ली, म्हसोबा ,शहरातील मेन रोड, बेहेडे सुपर शॉप, कोर्ट रोड या मार्गाने जाऊन महर्षि व्यास मंदीर या ठिकाणी या शोभायात्रेची सांगता होणार असून, यासाठी नगर परिषदच्या वतीने शहरात स्वच्छता निर्माण करून धुळीचा त्रास होऊ नये याकरिता शोभायात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात यावी, या शिवाय शहरात मांस-मटणाची दुकाने पूर्णपणे बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विधी विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
जनहित विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष चेतन सढळकर यांच्यासह तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, यावल शहर अध्यक्ष गौरव कोळी यांच्या स्वाक्षरी आहेत .