महावितरण कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा डॉ. विवेक सोनवणे यांची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये बाह्य स्रोत कामगारांचे ठेकेदारासह अधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ मागील काही महिन्यांपासून आंदोलन सुरू असून सदर बाह्य स्रोत कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा यासाठी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केलेली आहे.

मुक्ताईनगर महावितरण विभागामध्ये बाह्य स्त्रोत कंत्राटी तंत्रज्ञांची होणाऱ्या आर्थिक पिडवणूकीच्या निषेधार्थ कंत्राटी कर्मचाऱ्यांना वारंवार आंदोलने करावे लागत आहेत. कंत्राटी तंत्रज्ञाच्या उपोषणानंतर नवीन ठेकेदाराने त्यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र दिले, परंतु मागील काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या काही कंत्राटी तंत्रज्ञांना कामावरून कमी केले. विशेष म्हणजे सदर कंत्राटी कामगारांचे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन थकीत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदाराने सदर ठेका बंद केला असल्यामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना टक्केवारी न दिल्यामुळे आज रोजी कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष संताप जनक बाब म्हणजे नवीन ठेकेदार कंत्राट घेण्यासाठी आलेला असताना मुक्ताईनगर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी सदर ठेकेदाराला स्थानिक राजकीय नेत्यांची शिफारस घेऊन येण्यासाठी दबाव आणत आहेत. जर संबंधित ठेकेदाराने स्थानिक राजकीय नेत्यांची शिफारस न आणल्यास आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही असे अप्रत्यक्षरीत्या धमकी वजा इशारा देण्यात येत आहे.

मुक्ताईनगर महावितरण विभागातील बाह्य स्रोत कंत्राटी तंत्रज्ञांची अधिकाऱ्यांकडून होणारी शारीरिक मानसिक आर्थिक लूट तात्काळ थांबवून नवीन ठेकेदाराला कोणत्याही राजकीय नेत्याच्या पायावर लोळण्याची अट न लावता तात्काळ नवीन इच्छुक ठेकेदाराला नियुक्त करण्यात येऊन बाहय स्त्रोत कंत्राटी तंत्रज्ञांचे मागील दोन महिन्यापासूनचे थकीत वेतन तात्काळ देण्यात असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Protected Content