एरंडोल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एरंडोल शहरातील कासोदा फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर इतर तीन जण गंभीररित्या जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करत चक्क जेसीबीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग रस्ता खोदून काढला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतूक तब्बल ५ किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ हा गेलेला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे. बुधवार १० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता चार चाकी ट्रक क्रमांक (एमएच ४८ एटी ७६८२) वरील चालकाने भरदा वेगाने ट्रक चालवून थेट दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीके ४४२) ला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तरुण हा जागीच ठार झाला आहे. पुढे जात असलेल्या अजून एक दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दोन्ही दुचाकी ट्रकखाली अडकले आहेत.
दरम्यान या अपघातामुळे एरंडोलकरांनी रास्ता रोको करण्यात आला. या ठिकाणी संतप्त नागरिकांनी चक्क जेसीबीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावरील डांबरीकरण केलेला रस्ता खोदून काढला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे ५ किलोमीटर पर्यंत वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान बस ह्या एरंडोल शहरातून मार्गस्थ करत इतर रस्त्यातून काढत जळगाव मार्गे रवाना काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.
धरणगाव चौफुली येथे गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांची होती. दरम्यान याच ठिकाणाहून कासोदा फाटा, म्हसावद रोड, धरणगाव रोड, जळगाव रोड असे चारही मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाची आवश्यकता होती. मात्र याकडे प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील संतप्त नागरिकांनी केले आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.