रावेर (प्रतिनिधी) येथील खरेदी विक्री संघाच्या व्हाइस चेअरमनपदी बी.एन.पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
येथील संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या विशेष सभेत त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस.एफ. गायकवाड यांनी श्री. पाटील यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी चेअरमन पी.आर.पाटील, सभापती डी.एस.पाटील, जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कोळी, छाया विकास पाटील, अरुणा अर्जुन पाटील, सूर्यभान चौधरी, किशोर पाटील, राजन लासुरकर, लक्ष्मण मोपरी, यादवराव पाटील, जनार्दन पाचपांडे, डॉ राजेंद्र पाटील, उत्तम पाटील, सचिन पाटील, निलेश चौधरी, गोपाळ नेमाडे, सुनिल महाजन, व्ही.एम.गायकवाड, गोपाल महाजन, विनोद चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.