आ. सावकारेंच्या प्रयत्नातून ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी 8 कोटीचा निधी

sanjay savkare

भुसावळ (प्रतिनिधी) आ. संजय सावकारे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी 8 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर करुन आणला आहे.

 

नुकतेच 6 कोटी 28 लाखाची विकास कामे मंजुर करुन आणली असून येत्या काही महिन्यात ती कामे पुर्णत्वास येणार आहेत. ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा 8 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यात गोजोरे ते वराडसिम 3 कि.मी. रस्त्यासाठी 1 कोटी 68 लाख, फेकरी जुने गेट ते दिपनगर हायवे 2 कि.मी. रस्ता 1 कोटी 12 लाख रुपये निधी, भुसावळ शहरातील गांधी पुतळा ते तापी नदी पूल (भुसावळ -यावल रोड राज्य महामार्ग 43 ) 2.5 कि.मी. मार्गासाठी 1 कोटी 15 लाख रुपये, हातनूर ते टहाकळी रस्ता( राज्य महामार्ग 46) 2 कि.मी. रस्ता 1 कोटी निधी, चोरवड पासून 1 कि.मी. पुढे रस्ता 52 लाख रुपये, मोंढाळा ते शिंदी 4.400 कि.मी. रस्ता 1 कोटी 3 लाख , बेलव्हाय ते वराडसिम 6.420 कि.मी. रस्ता 1 कोटी 50 लाख रुपये निधी असा 8 कोटी रुपये निधी रस्त्यांसाठी मंजुर करुन आणला आहे. तालुक्यातील रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीसाठी आ. सावकारे यांनी यशस्वी पाठपुरावा करत आहे.

Protected Content