Home क्राईम तरूणाची दुचाकी लांबविली; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल

तरूणाची दुचाकी लांबविली; रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील वाटीका आश्रम परिसरातून एका तरूणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रदीप धनराज पाटील वय-३८ रा. वाघळूद ता.धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. कामाच्या निमित्ताने २४ डिसेंबर रोजी प्रदीप पाटील हा तरूण त्याच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीक्यू ४६८९) ने जळगाव शहरातील वाटीका आश्रम परिसरात आलेला होता. त्यावेळी त्याने कामाच्या ठिकाणी दुचाकी पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता  रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी हे करीत आहे.


Protected Content

Play sound