मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | राम मंदिराचं निमंत्रण मला आलेलं नाही. अशा कार्यक्रमांना जाणं मी टाळतो. पण, माझेही काही श्रद्धास्थान आहेत. त्याठिकाणी मी जात असतो. पण, याची मी जाहीरात करत नाही. सरकारकडे दुसरा कोणता मुद्दा नाही. त्यामुळे केवळ राम मंदिराच्या मुद्द्यावर लक्ष दिलं जात आहे, असं म्हणत पवारांनी निशाणा साधला.
संसदेत घुसखोरी झाली. त्यावर प्रश्न विचारले म्हणून १४६ खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यांची काय चूक होती. सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात आणि गॅस सोडतात त्याची माहिती घ्यायला नको का? संसद सरकार कशा पद्धतीने चालवू पाहतेय याचा हा उत्कृष्ट नमुदा आहे, असं शरद पवार म्हणाले.
एकच नेता राम मंदिराबाबत हे मी केलं म्हणून समोर आला होता. शिवसेनेची यात भूमिका आहे हे मी खूद बाळासाहेबांच्या तोंडून ऐकलं आहे. राम मंदिर झाले याचा आम्हाला आनंद आहे. मंदिरासाठी अनेकांचे योगदान आहे, असं पवार म्हणाले.