महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर राधाकृष्ण विखे पाटील अजूनही विरोधी पक्षनेते

Untitled

जळगाव : विजय वाघमारे

भाजपात प्रवेश करून कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घ्यायला तीन दिवस उलटत आले तरी अजूनही महाराष्ट्र सरकार विधानसभेच्या वेबसाईटवर राधाकृष्ण विखे पाटील अजूनही विरोधी पक्षनेते असल्याचा उल्लेख कायम असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

नगर जिल्ह्यातील मातब्बर नेते तथा विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकताच कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा प्रवेशानंतर लागलीच त्यांना गृहनिर्माण खात्यांचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. अगदी विखे पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाचा कारभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात देखील केली आहे. दुसरीकडे पावसाळी अधिवेशनही सुरु झाले आहे. परंतू तरी, देखील महाराष्ट्र विधानसभा सरकारच्या वेबसाईटवर राधाकृष्ण विखे पाटील अजूनही विरोधी पक्षनेते असल्याचा उल्लेख कायम आहे. साईटच्या होम पेजवर, विधानपरिषद आणि विधानसभेच्या लिंक पुढे (new) असा उल्लेख आहे. म्हणजेच यात बदल करण्यात आले आहेत  किंवा ती लिंक अपडेट आहे, असा अर्थ होतो. परंतू होमपेजच्या पहिल्या पानावर मात्र, ही वेबसाईट जून २०१८ नुसार अपडेट असल्याचा उल्लेख आहे. जर विधिमंडळाची साईट अपडेट राहत नसेल तर विविध शासकीय योजनांची माहिती सांगणाऱ्या वेबसाईटची काय स्थिती असेल? याचा विचार न केलेला बरा. दुसरीकडे यानिमित्ताने विरोधकांना सरकारची टिंगल उडवायची आणखी एक संधी चालून आली आहे.

 

शासनाच्या वेबसाईटची लिंक

http://mls.org.in/pdf%202018/monsoon%202018/Vidhansabha%20Member%20List-july%202018.pdf.pdf

Protected Content