फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान दत्तात्रय स्वतः गुरु असताना त्यांनी २४ गुरु केले. पृथ्वी, जल, वायु, आकाश, अग्नी, अजगर, भुंगा, पतंग, मासा, मधमाशी यांच्याकडून गुरुप्रमाणे गुणग्राही बनावे, चांगले घ्यावे म्हणून भगवान दत्तात्रयांनी यांना गुरु केले. गुरु सदेह असताना व देह सोडल्यानंतरही मानव जातीच्या कल्याणासाठी उपयुक्त असतात. संत हजारो वर्षानंतरही त्यांचे विचार सोडून जातात हीच खरी गुरुमहती आहे.
त्यांच्या विचार, आचाररुपी सुगंधाचा मानवाला नक्कीच फायदा होतो. गुरु शिवाय भगवत प्राप्ती होत नाही असे महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी अमृतवाणी सत्संगाप्रसंगी निरूपण करताना सांगितले.
येथील त्रिमूर्ती चौकातील टाकी वाड्यामध्ये गुरुवर्य संत श्री जगन्नाथ महाराज यांच्या बाविसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प. पू. प्रेमदास बापू, महंत पवनदास महाराज, भाजपा जिल्हा अध्यक्ष अमोल जावळे, नरेंद्र नारखेडे, एपीआय निलेश वाघ, एपीआय जालिंदर पळे, श्रीकांत रत्नपारखी यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.
यावेळी सतपंथ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. धर्मकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी सतपंथ परिवार काही दिवसापूर्वी अपघातात जखमी होऊन मृत्यू पावलेले स्वर्गीय नंदू जोशीच्या ब्राह्मण कुटुंबाला राजेश्वरी व ज्ञानेश्वरी श्रीकांत रत्नपारखी यांनी आपल्या बासरी वादनातून मिळालेली रक्कम अकरा हजार रुपये तसेच सतपंथ चारिटेबल ट्रस्ट तर्फे अकरा हजार रुपये मदत म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरि जी जी महाराज यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी महाराजांनी सांगितले की, धर्मकार्य, समाजकार्य करणाऱ्यांच्या पाठीशी सतपंथ परिवार निरंतर असेल. उपस्थित सर्व भाविक भक्तांनी स्वागत करून टाळ्यांचा प्रतिसाद दिला.