जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच पार पडलेल्या तालुक्यातील वडनगरी फाटा येथील बडे जटाधारी मंदिर परिसरातल्या शिव महापुराण कथेमध्ये डॉ. शाम तोष्णीवाल यांनी सातही दिवस हजारो भाविकांना मोफत ॲक्युपंक्चर सेवा प्रदान केली.
पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या बडे जटाधारी मंदिर परिसरातील कथेला उदंड प्रतिसाद लाभला. पाच दिवसांमध्ये जवळपास ५० लाखांपेक्षा जास्त भाविकांनी याला हजेरी लावली. या कथेच्या दरम्यान सातही दिवस डॉ. शाम तोष्णीवाल यांनी मोफत सेवा प्रदान केली. यात त्यांनी प्रामुख्याने पोलिसांसह सर्व स्वयंसेवकांना सेवा देऊन त्यांच्या वेदना दूर करण्याचे काम केले.
ॲक्युपंक्चर या प्रणालीच्या मदतीने कोणत्याही वेदनेला औषध न घेता आटोक्यात आणता येते. या माध्यमातून त्यांनी या परिसरात भरपूर चालून थकलेल्या स्वयंसेवकांना संजीवनी प्रदान केली. पोलीस पथकातील बहुतांश कर्मचार्यांनी याचा लाभ घेतला. यामुळे त्यांना लाभ झाल्याने पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी त्यांचे कौतुक देखील केले.
सात दिवसांमध्ये सुमारे पंधरा हजारांपेक्षा जास्त भाविक आणि स्वयंसेवकांनी या मोफत ऍक्युपंक्चर सेवेचा लाभ घेतल्याची माहिती डॉ. शाम तोष्णीवाल यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिली आहे.