Home क्राईम संतापजनक! सावत्र बापाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार

संतापजनक! सावत्र बापाकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार

0
104

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर शहरातील एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेच्या प्रियकराने तीच्या 14  वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापजनक म्हणजे, या नराधमाने मुलीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरणही केले होते. दरम्यान, सततच्या अत्याचाराला कंटाळून या मुलीने थेट पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील पुंडलिकनगर परिसरात ही धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली.

सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगीदोन वर्षांची असतांना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यांनतर तीचा पीडीत मुलीच्या सावत्र बापासोबत दुसरा विवाह झाला. मात्र, त्याची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून मुलीवर अत्याचार सुरू केले. तिला सातत्याने दुधात औषध देऊन तो अत्याचार करत राहिला. तसेच, तीला विवस्त्र करत तीचा मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरणही केले. या सर्व अत्याचाराने पीडित मुलगी घाबरून गेली होती. त्यामुळे, अखेर मुलीने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला.


Protected Content

Play sound