धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सोनवद खुर्द शिवारातील अंजनी नदीपात्रातून शेतकऱ्यारी ईलक्ट्रीक मोटारीचा चोरी केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, महेंद्र विश्वास पाटील (वय-२३) हा तरूण आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील सोनवद खुर्द येथे वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांचे सोनवद खुर्द शिवारातील अंजनी नदीजवळ शेत आहे. तसेच त्यांनी अंजनी नदी पात्रातून पाणी घेण्यासाठी ईलेक्ट्रीक मोटार लावलेली आहे. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते २१ नोव्हेबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी अंजनी नदी पात्रात लावलेले इलेक्ट्रीक मोटार चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेंद्र पाटील यांनी धरणगाव पोलीसात मोटार चोरी झाल्याबाबत तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजू पाटील करीत आहे.