लखनौ- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । कौशांबी जिल्ह्यात बलात्कार झालेल्या पीडितेची आरोपींनी कुऱ्हाडीने क्रुरतेने हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी समोर आला आहे.
कौशांबी जिल्ह्यातील महेवाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराची घटना घडली होती. गावात राहणाऱ्या पवन नावाच्या आरोपीने तरुणीवर बलात्कार केला होता. या प्रकरणात महेवागाट पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी पवनची तुरुंगात रवानगी केली होती. आरोपी १५ दिवसानंतर तुरुंगातून जामिनावर सुटला. त्यानंतर आरोपी व त्याचा भाऊ अशोक यांनी पीडित आणि तिच्या नातेवाईकांवर प्रकरण मिटविण्याकरिता दबाव टाकण्यास सुरुवात केली. मात्र, पीडितेनं कोणत्या परिस्थितीत गुन्हा मागे घेतला नाही.
सोमवारी २० नोव्हेंबर रोजी पीडिता शेतात गुरे चारून घरी परतत होती. गावाच्या दिशेने येणाऱ्या वाटेतच आरोपी अशोक आणि पवन यांनी पीडितेचा रस्ता आडविला. त्यावेळी दोघांनीही पीडितेवर कुऱ्हाडीचे घावून तिची निर्दयीपणाने हत्या केली. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हत्या होत असताना एकाही ग्रामस्थांनी पीडितेचे प्राण वाचविण्यासाठी पुढे येत हिंमत दाखविली नाही. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आरोपी अशोक याच्यावरदेखील हत्येचा यापूर्वी गुन्हा दाखल आहे. तर त्याचा भाऊ पवनची बलात्काराच्या प्रकरणात जामिनावर सुटका झाली होती. पीडित तरुणीवर गुन्ह्याबाबत तडजोड करण्याकरिता गुंडांनी दबाव निर्माण केला होता. मात्र, पीडितेनं कोणतीही तडजोड करण्याकरिता तयारी दाखविली नाही.