भुसावळ (प्रतिनिधी) कोलकाता येथे डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांच्या घटनांमुळे डॉक्टरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शहरातील सर्व रुग्णालये १७ जून रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते १८ रोजी सकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
या घटनेचा निषेध करण्यासाठी आज शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिनेश फिरके यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले. या दरम्यान काही अत्यावश्यक सेवा गरजेची असलेल्या रूग्णांना तशी सेवा देण्यात येईल, असे आयएमएचे अध्यक्ष डॉ. फिरके यांनी यावेळी सांगितले. असोसिएशनच्या सेक्रेटरी डॉक्टर शितल चौधरी यांनी यावेळी म्हटले की, डॉक्टर रूग्णांना सेवा देण्यासाठी आहेत. कोणीही रुग्णालयाची तोडफोड करु नये, डॉक्टरांना बंद काळात जनतेने सहकार्य करावे.