सावकराचा जांच : कर्जफेडण्यासाठी बापानं मुलाला काढलं विकायला !

लखनऊ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  अलिगढ येथील एका रिक्षा चालकाने सावकराच्या जांचाला कंटाळून पोटच्या मुलाला विकायला काढण्याचं खळबळजनक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मुलाला विकायचं असल्याची पाटी गळ्यात लटकवून शहरातील गांधीचौकात आपल्या परिवारासह बसलेला होता. हा प्रकार पोलीसांच्या लक्षात आल्यानंतर चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यानंतर पोलीसांनी सावकरावर कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे.

पीडित राजकुमार हे ई-रिक्षा चालवून आपला उदारनिर्वाह करतात. त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सावकाराकडून काही कर्ज घेतलं होतं. मात्र हे कर्ज वेळेवर परत करण्यास त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे राजकुमार यांना सावकाराच्या गुंडांनी जबर मारहाण केली. गुंडांनी राजकुमार यांचं सामान फेकून देत राजकुमार यांनाही घराबाहेर हाकलून लावलं. यासह त्यांची रिक्षाही पळवून नेली.

त्यामुळे या गुंडांवर कारवाई करण्यासाठी राजकुमार हे महुआ खेडा पोलीस ठाण्यात चकरा मारत आहेत. मात्र न्याय न मिळाल्यानं राजकुमार यांनी आपला मुलगा विकायला काढला आहे.   मात्र गांधी पार्क पोलिसांनी त्यांना तत्काळ पोलीस ठाण्यात नेत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून या प्रकरणाचा पुढील तपास व चौकशी करण्यात येत आहे.

Protected Content