भुसावळ प्रतिनिधी । शहरातील बजाज बिल्डींगजवळ मानव सेवा व पर्यावरण बचाव फाऊंडेशनतर्फे ईद मीलनासह वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास पवार, नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी सैन्य अधिकारी जे. एस.पठाण,दिलीपसिंह पचेरवाल, अजमल खान आदींच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे म्हणाले की, मानव सेवा व पर्यावरण बचाव फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून असे उपक्रम प्रत्येक नागरिकाने राबवून ठिकठिकाणी वृक्षारोपण करून व त्याचे संगोपन करून आपल्या परिसराला हिरवेगार करावे.
या कार्यक्रमास प्रफुल्ल नेवे, प्रशांत नेवे, विकास चव्हाण, उदय जोशी, प्रेम परदेशी, शकील पटेल, अनिल सोनवणे, कलीम पायलट, संजय काशिव, जयंत गोसावी, बाबूलाल दीक्षित, कैलास मौर्या, अरुण पाटील, किशोर आंबोले, शिवा आंबोले, अब्दुल खालिक बागवान, गणेश नरसिंग गोडाले, शुभम पचेरवाल, मिलिंद गायकवाड, साबीर शेख, धर्मपाल सोनवणे, संजय गोसावी, मोहन गोसावी,मोहम्मद आसिफ शहंशाह, दीपक पाचपांडे, शेख सत्तार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिम्मत गोसावी,रवींद्र पाचपांडे,शकील शेख, हरी वारके,शेख आसीम, शेख अफ्फान,मोहन पाचपांडे, आनंद बोरीकर आदींनी परिश्रम घेतले.