Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणाऱ्याला एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणाऱ्याला एकावर गुन्हा दाखल


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहूर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १९ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अल्पवयीन मुलगी ही बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मिळून आली नाही. दरम्यान पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी गावात राहणारा सावन शांताराम भिल यानेच पळवून नेल्याची तक्रार पहूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सावन भिल याच्या विरोधात पहूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकॉ भरत लिंगायत करीत आहे.


Protected Content

Play sound