जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शाखेतर्फे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर दि. १३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण २६४ विद्यार्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला. आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयातील नियुक्त निवासी डॉ.महेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या.
केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शाखेतर्फे आयोजित केल्या गेलेल्या आरोग्य तपासणी शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, प्रा. डॉ. प्रज्ञा विखार, प्रा. डॉ. श्रीकांत तारे यांचे सहकार्य लाभले. केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शाखाप्रमुख प्रा. राहुल पाटील आणि प्रा. प्रवीण भंगाळे यांनी या शिबिराचे व्यवस्थापन केले.