रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीच्या घरात घसुन अश्लिल चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवार ५ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात २२ वर्षीय तरूणी ही मावशी व आजीसोबत वाास्तव्याला आहे. धुणीभांडीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. तरूणी ही मावशी व आजी यांच्यासोबत घरात झोपलेले असतांना गुरूवारी ५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या परिसरात राहणारा मोन्या उर्फ सुमित सुधाकर बनसोडे हा घरात घुसला. त्यानंतर तरूणीचे तोंड दाबून अश्लिल चाळे करत विनयभंग केला. त्यावेळी तिची मावशी व आजी झोपेतून जागे झाल्याने त्यांना पाहून सुमित हा पसार झाला. दरम्यान, पिडीत तरूणीने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मोन्या उर्फ सुमित सुधाकर बनसोडे यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे.