जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अभ्यासाच्या ताणावातून सुसाईड नोट लिहून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तन्मय गजेंद्र पाटील (वय-१४) रा. गणेश कॉलनी,जळगाव असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गणेश कॉलनी परिसरात तन्मय हा आई, वडील ॲड. गजेंद्र पाटील आणि मोठा भाऊ ओम यांच्यासोबत वास्तव्याला होता. शहरातील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. गेल्या काही दिवसांपासून तो अभ्यासाच्या तणावात होता. मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्वजण झोपले होते. त्यावेळी तन्मय याने घराच्या वरच्या मजल्यावर छताला गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापुर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. अभ्यासाच्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. वडील गजेंद्र पाटील हे रात्री लघुशंकेला उठले असता त्यांना जागेवर तन्मय दिसून आला नाही. म्हणून त्यांनी वरच्या खोली जावून पाहिले असता त्याने गळफास घेल्याचे असून आले. त्यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अदित्य साळुंखे यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष सोनवणे करीत आहे. मयताच्या पश्चात आई,वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.