जळगाव प्रतिनिधी । राज्य सिंधी साहित्य अकादमीची महाराष्ट्र शासनाकडून पुनर्रचना करण्यात आली. कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी कार्याध्यक्षपदी शासनाने माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवानी यांची निवड केली होती. शासनाने त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला आहे. दरम्यान, सिंधी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या समितीतल्या अशासकीय सदस्यांमध्ये जळगावचे डॉ. मूलचंद उदासी व रितू रायसिंघानी यांचादेखील समावेश आहे.



